मोबाईल वरून PAN Card Aadhar Card Link कसा करावा?

How to Link Pan Card with Aadhar Card

बऱ्याच व्यक्तींना ही गोष्ट माहिती असेलच की 31 मार्च 2020 या तारखेपर्यंत आपला Pan Card Aadhar Card सोबत लिंक करणे अनिवार्य आहे. या तारखेपर्यंत Pan Card Aadhar Card Link केले नाही तर आपला Pan Card बंद होईल. आपल्यापैकी अनेकांचे Pan Card लिंक झालेले असतील पण ज्या व्यक्तींचे Pan लिंक झालेले नाहीत किंवा त्यांनी केलेले नाही असा व्यक्तीसाठी ही शेवटची संधी असणार आहे.

त्यामुळे आम्ही आपल्यासोबत याठिकाणी मोबाईल वरून Pan Card Aadhar सोबत कसा लिंक करता येईल ही माहिती शेयर करणार आहोत.

खाली दिलेल्या माहितीचा वापर करून आपण आपला Pan Card Adhar लिंक करून घेऊ शकता.

- सर्वात आधी आपला Pan card आणि Aadhar Card बाहेर काढून घ्या आणि नंतर खाली दिलेल्या Pan-Aadhar Link या बटण वर क्लिक करा.
- आता आपल्यासमोर एक नवीन वेबसाईट ऑपन झालेली दिसेल.
- या ठिकाणी खालीलप्रमाणे सर्व माहिती भरा.

  • PAN : PAN समोरील चौकटीमध्ये आपला Pan Card नंबर व्यवस्थित भरा.
  • Aadhar Number : या चौकटीमध्ये आपला पूर्ण आधार नंबर टाका. (मध्ये जागा सोडू नका)
  • Name as per Aadhar : या चौकटीमध्ये आपल्या आधार कार्ड वर जसे नाव असेल तसेच टाईप करा.
  • जर आपल्या आधार कार्ड वर फक्त जन्म वर्ष असेल तर I have only year of birth in Aadhar Card समोरील चौकटीवर क्लिक करा. जन्म तारीख पूर्ण असेल तर मात्र क्लिक करू नका.
  • I agree to validate my Aadhar details with UIDAI समोरील चौकटीवर क्लिक करा.
  • खाली असणाऱ्या चित्रातील अक्षरे चित्राच्या खालील चौकटीमध्ये लिहून Link Aadhar या बटनवर क्लिक करा.
  • आता आपला Pan Aadhar लिंक झाल्याचा msg दिसेल.
तर असा पद्धतीने आपल्या मोबाईल वरच आपण Pan Aadhar लिंक करू शकता. व्यवस्थित समजून घेण्यासाठी खाली दिलेला आमचा Video बघा आणि इतर videos बघण्यासाठी आमचा Channel Subscribe करून घ्या. आपले काही प्रश्न असतील किंवा आमच्या सुधारणेसाठी सूचना असतील तर खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा आपल्या विचारांचे नेहमी आमच्याकडून स्वागतच केले जाईल. असा प्रकारच्या विविध पोस्ट साठी आमच्या ब्लॉगला नेहमी भेट देत राहा आणि आम्हाला Facebook, Instagram वर सुधा Follow करू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या