Facebook Messenger varun aapoaap delete honare messages pathava

Facebook Messenger वरून आपोआप Delete होणारे Messages पाठवा

Social Media च्या वापरणे आपण अनेक व्यक्तींना संपर्क करू शकतो त्यांच्याशी समोरासमोर गप्पा मारू शकतो पण अनेक वेळेस एखाद्या व्यक्तीसोबत Messages पाठवून बोलल्यानंतर आपण ते सर्व messages delete करत असतो आणि delete करण्यासाठी आपल्याला स्वत:च ते delete करावे लागतात; पण जर messages स्वत:च delete झाले तर? हो हे facebook messenger च्या माध्यमातून करता येऊ शकतं. Facebook messenger वरून send केलेले messages अपोआप delete होऊ शकतात. ते कसं करायचं हे आपण बघणार आहोत.

सर्वात अगोदर messenger open करून घ्या.

नंतर मोबाईलच्या उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला एक पेन्सिल चं चिन्ह दिसेल त्याच्यावर क्लिक करा.

आता आपल्या समोर एक विंडो उघडेल वर तिथे New Message म्हणून लिहिलेलं असेल त्याच्या समोर एक कुलूप असलेलं बटण असेल त्याच्यावर क्लिक करून चालू करा.

आता खाली असलेल्या यादी पैकी ज्या व्यक्तीला message करायचा असेल तो सिलेक्ट करा.

जो message असेल तो type करा आणि message च्या डाव्या बाजूला असणाऱ्या घड्याळाच्या चिन्हावर क्लिक करून वेळ निवडून message send करा. (जेवढा वेळ निवडलेला असेल तेवढ्या वेळेनंतर message आपोआप delete होईल)

व्यवस्थित समजून घेण्यासाठी खालील video पूर्ण बघा आणि इतर असेच video बघण्यासाठी Ajay Chaitya EduTech या आमच्या YouTube Channel ला Subscribe करून घ्या.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या