YouTube ची Search आणि Watch History Delete कशी करावी ?


सध्या ज्या व्यक्तीकडे Smart Phone आहे असा प्रत्येक व्यक्ती आपल्या मोबाईल मध्ये जास्तीत जास्त YouTube चा वापर करीत आहे. प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार त्याचा विविध पद्धतीने वापर करीत आहे, कुणी नवीन गोष्टी शिकण्यासाठी, कुणी करमणुकीसाठी तर कुणी निव्वळ मनोरंजन म्हणून काहीही बघण्यासाठी व याच गोष्टीमुळे आपण YouTube वर अनेक गोष्टी Search करीत असतो.

आपण जी पण गोष्ट YouTube वर Search करतो आणि बघतो त्या सर्व गोष्टी YouTube Save करून ठेवत असतो व त्याचा वापर करून आपल्याला त्यानुसार विविध Suggested Video दिसत असतात. काही वेळेस आपला मोबाईल इतर व्यक्तीने घेतला आणि त्याने जर ती YouTube History बघितली तर आपल्याला काहीसं लाजीरवाण वाटत असत त्यामुळे YouTube मध्ये Save झालेली History Delete कशी करायची हे आपण येथे बघणार आहोत.

YouTube History Delete कशी करायची हे पुढे बघूया.

  • सर्वात अगोदर आपला YouTube App उघडा.
  • यामध्ये वरच्या उजव्या कोपऱ्यात असणाऱ्या profile वर क्लिक करा.
  • Settings या पर्यायावर क्लिक करा.
  • आता आपल्यासमोर वेगवेगळे पर्याय दिसतील त्यापैकी History & Privacy या पर्यायावर क्लिक करा.
  • आता Clear watch history या पर्यायावर क्लिक करा. क्लिक केल्यावर एक msg दिसेल त्यावर खालच्या बाजूला cancel आणि clear watch history असे पर्याय दिसतील त्यापैकी clear watch history हा पर्याय निवडा. आता आपली Watch History डिलीट झालेली असेल.
  • असाच पद्धतीने Clear Search History याचा वापर करून search history डिलीट करता येईल.

समजून घेण्यासाठी खालील video बघा आणि आवडल्यास YouTube वर जाऊन Ajay Chaitya EduTech या माझ्या channel ला Subscribe करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या