कोणताही App न वापरता Hide करा मोबाईल मधील Photos, Videos आणि Folders


Hello Friends मी अजय चैत्या....... आज परत एक मोबाईल ट्रिक घेऊन आलेला आहे. या ट्रिक चा वापर करून आपण आपल्या मोबाईल मधील कोणत्याही प्रकारची File Hide करू शकता तेही कोणत्याही Third Party App चा वापर न करता. या एका छोट्या ट्रिकच्या मदतीने आपल्या मोबाईल मधील सर्व प्रकारच्या files म्हणजेच photos, videos किंवा folders hide करता येतील.

चला तर files hide कसा करू शकतो ते बघूया.
  • आपल्याला जी file hide करायची असेल ती file ज्या ठिकाणी save केलेली असेल तो folder उघडा. (file manager मध्ये जाऊन)
  • ज्या file ला hide करायचं असेल ती file select करा आणि rename हा पर्याय निवडा.
  • नंतर त्या file च्या नावाच्या अगोदर एक डॉट (.) टाईप करा. (उदा : file चे नाव जर my file असेल तर .my file असे टाईप करा) नंतर ok करा.
  • आता आपली file hide झालेली असेल.

Hide केलेली file परत बघण्यासाठी काय करायचं ते बघूया.
  • ज्या ठिकाणी file hide केलेली असेल तो folder उघडा.
  • नंतर option मध्ये जाऊन settings हा पर्याय निवडा.
  • settings मध्ये show hidden files समोर असलेल्या चौकटीवर क्लिक करा आणि back बटण दाबा.
  • आपल्याला hide केलेली file बघायला मिळेल.
  • परत hide करण्यासाठी settings मध्ये जाऊन show hidden files समोरील चौकटीवर असलेली टिक काढून टाका.

खालील video बघा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या