मोबाईल नंबर Save न करता WhatsApp Message पाठवा


WhatsApp चा वापर करत असताना काही वेळेस आपल्याला एखाद्या व्यक्तीला message करायचा असतो पण त्या व्यक्तीचा नंबर save करायचा नसतो त्यासाठी करणे अनेक असू सकतात. असाच काही कारणामुळे एका मित्राने प्रश्न विचारला की, नंबर save न करता message करता येईल का म्हणून त्याला उत्तर देताना हा ब्लॉग लिहिण्याची कल्पना आली.

मोबाईल नंबर save न करताच एखाद्या व्यक्तीला message करता येऊ शकतो. त्यासाठी आपल्याकडे त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर व आपल्या मोबाईल मध्ये ब्राउजर असला पाहिजे. हे कसे करता येईल ते पुढे बघूया.
  • आपल्या मोबाईलचा data connection चालू करून मोबाईल मधील कोणताही browser उघडा. (Chrome, UC Browser, Opera mini etc.)
  • Browser उघडल्यावर त्यामध्ये पुढीलप्रमाणे url टाईप करा. https://api.WhatsApp.com/send?phone=number (number च्या ठिकाणी त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर टाईप करा व लिंक ऑपन करा)
  • उदा. https://api.WhatsApp.com/send?phone=9177XXXXXXX6 (मोबाईल नंबरच्या सुरुवातीला 91 टाकायला विसरू नका)
  • लिंक ऑपन झाल्यानंतर आपल्यासमोर एक पेज दिसेल ज्याच्यावर त्या व्यक्तीचा नंबर आणि त्याखाली Message म्हणून एक बटण दिसेल त्याच्यावर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर WhatsApp Chat Screen उघडलेली आपल्याला बघायला मिळेल. आता आपण त्या व्यक्तीला message करू शकता.

तर असा पद्धतीने मोबाईल नंबर save न करताही आपण WhatsApp message करू शकतो.

समजून घेण्यासाठी खालील video बघा आणि जर आमचा YouTube Channel Subscribe केला नसेल तर करून घ्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या