गुगल ड्राईव्ह ही
गुगल कडून फाईल साठवण्यासाठी सुरु करण्यात आलेली सेवा आहे. ही सेवा सामान्य
लोकांसाठी 24 एप्रिल
2012 पासून सुरु करण्यात
आली. जेव्हा लोकांना Offline Storage कमी पडू लागला त्यावेळेस जगासमोर Cloud Storage हा एक चांगला पर्याय बनून समोर आला. या Cloud
Storage पैकी एक असलेली गुगल
ड्राईव्ह ही सेवा आहे. गुगल ड्राईव्हने खुप कमी वेळात भरपूर लोकप्रियता मिळविली.
याची भरपूर वैशिष्ट्ये आहेत जसे की, Uploading Files, Creating Folders,
Sharing Files, Documents Create, Edit इत्यादी.
गुगल ड्राईव्ह ही एक cloud
based storage service आहे.
ही service वापरकर्त्यांना file
online store आणि access करण्याची सुविधा उपलब्ध करून देते. या service
मार्फत वापरकर्ते आपल्या mobile,
computer किंवा इतर device
मधील आपले documents, photos,
videos इत्यादी cloud
वर साठवून ठेवू शकतात. गुगल ड्राईव्ह Google
च्या इतर services सोबत अगदी सहजतेने जोडली जाते. उदा. Gmail,
YouTube, Chrome आणि इतर सेवा ज्या
गुगल कडून पुरविल्या जातात.
Google Drive ही आतापर्यंतच्या
सर्व सर्व cloud storage services पैकी
सर्वाधिक जास्त लोकप्रिय आहे. Google ड्राईव्ह कडून आपल्या cloud storage वर प्रत्येक वापरकर्त्याला 15GB पर्यंतची जागा Free मध्ये उपलब्ध करून देण्यात येते.
त्यामुळे जर आपण online storage service चा वापर अजूनही केला नसेल तर आपल्याला online storage चे फायदे नक्की समजून घेतले पाहिजेत.
त्याचं कारण असं की ह्या files वापरकर्ता
कोणत्याही वेळेस आपल्या computer किंवा
mobile वरून हाताळू शकतो,
त्यासाठी इंटरनेटची आवश्यकता असेल. Drive
वर सेव केलेली file वापरकर्ता कुठूनही download किंवा print करू शकतो त्यामुळे आपल्याला कागदपत्रे
सोबत घेऊन फिरताना होणाऱ्या अडचणी दूर होतात.
Google Id (Gmail Id) च्या
सहाय्याने आपण Google Drive चा
वापर करू शकतो. मोबाईलवर गुगल ड्राईव्हचा वापर करण्यासाठी आपण Google Drive
चं App डाऊनलोड करून त्याचा वापर करू शकतो.
तसेच computer वर
वापर करण्यासाठी गुगल ड्राईव्ह च्या वेबसाईटचा वापर करता येईल.
Google Drive चा वापर कसा करायचा
हे खाली दिलेल्या व्हिडीओ मध्ये बघता येईल.
या article मध्ये Google Drive विषयी दिलेली माहिती आपल्याला आवडेल अशी
आशा आहे. आपल्या मनात या article विषयी
जर काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून विचारू शकता आणि ही
माहिती व व्हिडीओ आवडला असेल तर आपल्या Social Network मध्ये शेयर करा व आमच्या युट्युब
चॅनेलला सस्ब्क्राईब करून फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका.
0 टिप्पण्या