युट्युब व्हिडियो डाऊनलोड करा | How to Download YouTube Video Without App



YouTube Video ksa Download karava | MP3 madhye download kra

एका मित्राने सहज म्हणून एक प्रश्न विचारला की, "युट्युब वरील व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठी एखादा चांगला App कोणता?" म्हणून त्याने विचारलेल्या या प्रश्नावर डोक्यात एक विचार आला की प्रत्येक जन युट्युब व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठी आपापल्या आवडीनुसार कोणत्या ना कोणत्या App चा वापर करत असणार कदाचित तुम्हीही करत असाल. पण माझ्याकडे एक अशी युक्ती आहे ज्याचा वापर केल्यास आपल्याला युट्युब व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठी कोणत्याही App ची आवश्यकता भासणार नाही. खाली दिलेल्या युक्तीच्या सहाय्याने आपण कोणताही App न वापरता युट्युब व्हिडीओ डाऊनलोड करू शकता.


व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठी खालील स्टेप नुसार कृती करा.

स्टेप 1 : आपल्याला जो व्हिडीओ डाऊनलोड करायचा असेल तो युट्युब मध्ये ऑपन करा.

स्टेप 2 : जर आपण युट्युब App मध्ये व्हिडीओ ऑपन केला असेल तर, त्या व्हिडीओला शेयर करण्यासाठी असलेल्या पर्यायावर क्लिक करा. (ब्राउजर मध्ये ऑपन केला असेल तर स्टेप 5 वर जा.)

स्टेप 3 : शेयर या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर वेगवेगळे पर्याय दिसतील त्यापैकी Copy Link या पर्यायावर क्लिक करा. व्हिडीओची लिंक कॉपी झाली असेल आता युट्युब App मधून बाहेर या.

स्टेप 4 : आता कोणताही ब्राउजर ऑपन करा व आधी कॉपी लिंक अड्रेसबारमध्ये पेस्ट करून ती लिंक ऑपन करा.

स्टेप 5 : स्क्रीनवर आपल्याला हवा असलेला व्हिडीओ असल्याची खात्री करून घ्या व नंतर परत अड्रेसबार वर क्लिक करा.

स्टेप 6 : आपल्याला यामध्ये पुढे दाखवल्याप्रमाणे लिंक दिसेल. https://www.youtube.com/watch?v=xdHif9Crpb0
या लिंक मध्ये youtube च्या नंतर pp (दोन वेळेस p) टाईप करा. पुढील उदा. बघा https://www.youtubepp.com/watch?v=xdHif9Crpb0 असा पध्दतीने टाईप केल्यानंतर ती लिंक ऑपन करा.

स्टेप 7 : आता आपल्यासमोर एक नवीन पेज ऑपन झालेलं बघायला मिळेल. यामध्ये आपल्याला डाऊनलोड करायचा असलेला व्हिडीओ व त्याचे वेगवेगळे Format बघायला मिळतील. त्यापैकी आपल्याला हवा असलेल्या Format समोरील डाऊनलोड पर्यायाचा वापर करून व्हिडीओ डाऊनलोड करता येईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या