YCMOU Backlog Exam Form 2024 (डिसेंबर 2024/जानेवारी 2025) झाले सुरु

YCMOU Backlog Exam Form 2024

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला आहे परंतु काही कारणामुळे परीक्षा देता आली नाही किंवा परीक्षेमध्ये नापास झाले असतील असा विद्यार्थ्यांना परत परीक्षा देता यावी यासाठी डिसेंबर / जानेवारी महिन्यामध्ये YCMOU Backlog Exam घेण्यात येते. त्याचप्रमाणे YCMOU Backlog Exam Form 2024 सुद्धा सुरु झालेले आहेत.

मुक्त विद्यापीठाकडून Backlog Exam साठी सूचनापत्र प्रसिद्ध करण्यात आलेले आहे, त्यानुसार ही परीक्षा 7  जानेवारी 2025 पासून सुरु होणार आहे आणि त्यासाठीचे वेळापत्रक हे ऑक्टोबर 2024  च्या शेवटच्या आठवड्यात विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होतील.

YCMOU Backlog Exam Form Last Date 2024

YCMOU Backlog Exam Form Last Date 2024

विद्यार्थ्यांना 13 सप्टेंबर पासून रिपीटर परीक्षेसाठी अर्ज करता येणार असून 10 ऑक्टोबर 2024 शेवटची दिनांक असणार आहे. तरीही विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करण्याचा वेळापत्रक नीट समजून घेणे आवश्यक आहे.

विनाविलंब शुल्कासह (Without Late Fee) अर्ज करण्याची मुदत 13 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत देण्यात आलेली आहे. शक्यतो विद्यार्थ्यांनी या मुदतीमध्येच अर्ज करावेत. कारण 1 ऑक्टोबर पासून 5 ऑक्टोबर पर्यंत रु. 100  एवढे विलंब शुल्क (Late Fee) भरावे लागेल. तर विशेष विलंब शुल्क (Super Late Fee) रु. 500 सह 10 ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरता येतील.

हे पण वाचा : YCMOU अभ्यासक्रमाची पुस्तके (B.A/B.Com)

YCMOU Backlog Exam Fees

YCMOU Backlog Exam Fees

परीक्षेची फी किती असेल हे आपले किती विषय राहिले आहेत आणि आपण कोणत्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहेत यावर अवलंबून आहे. जर आपण B.A/B.Com चे विद्यार्थी असाल आणि आपण 13 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये अर्ज केला तर रु. 180 प्रती पेपर एवढी फी असेल. M.A/M.Com चे विद्यार्थी असाल तर रु. 200 प्रती पेपर एवढी फी असेल.

यानंतर च्या मुदतीमध्ये अर्ज केल्यास अनुक्रमे विलंब शुल्क आणि विशेष विलंब शुल्कासह आपली फी मोजली जाईल.

How to fill YCMOU exam form?

YCMOU Backlog Exam Form विद्यापीठाच्या ycmou.digitaluniversity.ac या अधिकृत वेबसाईट वरून ऑनलाईन भरता येतील.

YCMOU Repeater Exam Form Link : Click Here

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या