अनेक विद्यार्थी मित्र नोकरी करत असताना शिक्षण पूर्ण व्हावे म्हणून YCMOU मध्ये प्रवेश घेत असतात. मात्र तरीही त्यांच्या मनात पदवी विषयी माहिती प्रश्न निर्माण झालेले असतात. जसे की इतर (नियमित) विद्यापीठाच्या तुलनेत YCMOU पदवीची किंमत काय?
असेच काही प्रश्न आपल्या मनात असतील तर आपण अगदी योग्य ठिकाणी आलेले आहेत, या पोस्ट मध्ये आपण YCMOU सी संबंधित काही प्रश्न/शंका समजून घेणार आहोत.
सर्वात आधी YCMOU म्हणजे काय "यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ". मुंबई विद्यापीठाप्रमाणेच हे सुध्दा एक विद्यापीठ आहे फक्त फरक एवढाच की हे विद्यापीठ मुक्त शिक्षण उपलब्ध करून देते. ज्याच्या फायदा लाखो विद्यार्थी घेत आहेत.
Ycmou Degree Value
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची (YCMOU) पदवी ही सुध्दा इतर विद्यापीठाच्या पदवीप्रमाणेच मान्यताप्राप्त आहे. नियमित विद्यापीठाची पदवी आणि मुक्त विद्यापीठाची पदवी या दोन्ही पदवी एकसमान आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारचा कमीपणा किंवा भेदभाव नाही.
Is YCMOU Good or Bad? YCMOU चांगले की वाईट ?
अनेक मित्र-मैत्रिणींना हा प्रश्न पडलेला असतो कारण आपण काही व्यक्तींकडून तसे ऐकलेले असते. पण याचे उत्तर प्रत्येक व्यक्ती आणि त्याला आलेल्या अनुभवानुसार वेगळे असू सकते.
मात्र विद्यापीठामधून मिळत असलेले शिक्षण आणि त्यांच्या अभ्यासक्रम समजून घेतला तर हे विद्यापीठ चांगलेच आहे. अनेक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून MPSC साठी सुध्दा या विद्यापीठाच्या पुस्तकांचा अभ्यास केला जातो.
YCMOU सरकारी विद्यापीठ आहे का?
हे महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठ सार्वजनिक / सरकारी असून याला UGC कडून मान्यता देण्यात आलेली आहे. UGC ही भारतातील विद्यापीठांना मान्यता देणारी एक संस्था आहे.
मान्यताप्राप्त विद्यापीठ असल्याने या विद्यापीठाची पदवी आपल्याला कोणत्या खाजगी/सरकारी नोकरीसाठी वापरता येऊ शकते.
सरकारी विद्यापीठ असल्याने यामधील अभ्यासक्रमांसाठी फी सुध्दा कमी ठेवण्यात येते. या विद्यापीठामार्फत अनेक शिक्षणक्रम (Courses) पुरविले जातात.
हे पण वाचा : YCMOU Courses List
YCMOU NAAC मान्यताप्राप्त आहे का?
कॉलेज आणि विद्यापीठांचे NAAC कडून मुल्यांकन करण्यात येते, असेच मुल्यांकन YCMOU चे सुध्दा करण्यात आले. NAAC कडून करण्यात आलेल्या या मूल्यांकनामध्ये विद्यापीठाला A Grade सह मान्यता देण्यात आले आहे.
ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटली असेल तर आपल्या इतर मित्र-मैत्रिणीसोबत शेयर करा. तसेच आमच्या YouTube Channel खालील व्हिडीओ बघा आणि असेच उपयुक्त माहितीसाठी Channel Subscribe करा.
0 टिप्पण्या