YCMOU Admission 2022-23 ऑनलाईन प्रवेश अर्ज सुरु

YCMOU

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये (YCMOU) २०२२-२३ साठी प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली असून विद्यार्थ्यांना B.A, B.Com सहित इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहे.

मागच्या दोन वर्षातील महारोगाच्या काळामध्ये विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षा घेतल्या होत्या. मात्र या वर्षी विद्यापीठाने अधिप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घ्यायचे ठरविले आणि सर्व परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी विद्यापीठाला जुलै महिना  लागला.

म्हणूनच कदाचित अजून परीक्षा संपल्या तरी विद्यापीठाकडून पुढील शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे.

आपल्याला YCMOU मधून एखाद्या शिक्षणक्रमाला प्रवेश घ्यायचा असल्यास त्यासाठीची  माहिती विद्यापीठाच्या वेबसाईट वरील प्रॉस्पेक्टस मधून बघता येईल.

प्रॉस्पेक्टस मध्ये आपल्याला संबंधित शिक्षणक्रमाविषयी पात्रता, फी इत्यादींची माहिती बघायला मिळेल.

या पोस्टमध्ये काही शिक्षणक्रमाचे माहितीपुस्तिका खाली देण्यात आलेल्या आहेत त्या आपण आवश्यकतेनुसार डाऊनलोड करू शकता.

YCMOU Admission 2022-23 Official Link 

ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठीआपल्याला विद्यापीठाच्या ऑफिशिअल वेबसाईटचा वापर करावा लागेल. विद्यापीठाची वेबसाईट खाली देण्यात आली आहे.

YCMOU Admission Website : https://ycmouoa.digitaluniversity.ac

Admission फॉर्म भरण्यासाठी Last Date

YCMOU च्या विविध अभ्यासक्रमांसाठी ६ जुलै २०२२ पासून प्रवेश सुरु झालेले असून ३१ ऑगस्ट पर्यंत आपल्याला प्रवेश घेता येणार आहे. या कालावधीत ऑनलाईन फॉर्म भरून आपण आपला प्रवेश निश्चित करू शकता.

प्रवेश अर्ज ३१ ऑगस्ट पर्यंत चालू  असले तरी या ठिकाणी ६ जुलै ते १५ ऑगस्ट पर्यंत आपल्याला कोणताही विलंब शुल्क (Late Fee) द्यावा लागणार नाही मात्र त्यानंतर १६ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट पर्यंत विलंब शुल्क भरून प्रवेश घ्यावा लागणार आहे.

YCMOU Admission Prospectus (माहितीपुस्तिका) 2022-23

अभ्यासक्रमासाठी आवश्यक पात्रता आणि अभ्यास केंद्र / विद्यापीठाचे शुल्क (Fee) किती असेल तसेच इतर माहिती आपल्याला माहितीपुस्तिकेच्या आधारे मिळू शकेल, म्हणून या ठिकाणी काही अभ्यासक्रमाची माहितीपुस्तिका देण्यात आलेल्या आहेत.

अभ्यासक्रमाविषयी अधिक माहितीसाठी खालील माहितीपुस्तिका डाऊनलोड करून घ्या.


B.A Prospectus 2022-23 Download

B.Com Prospectus 2022-23 Download

B.Sc (Agriculture) कृषी विज्ञान पदवी Prospectus 2022-23 Download

ही माहिती आपल्याला उपयुक्त ठरेल अशी आशा आहे. अशीच माहिती मिळवत राहण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट देत राहा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या