यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ म्हणजेच YCMOU मधून दूरस्थ म्हणजेच नियमित कॉलेजला न जाता विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळते. यामुळेच अनेक विद्यार्थी नोकरी किंवा काम सांभाळत आपले शिक्षण पूर्ण करत आहेत.
विद्यापीठाकडून आतापर्यंत परीक्षा ह्या मे महिन्यामध्ये घेण्यात येत होत्या परंतु, पसरलेल्या आजारामुळे YCMOU च्या मागील दोन वर्षांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या होत्या, परंतु आता परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे दिसत आहे त्यामुळे परीक्षा कश्या होणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
म्हणून या पोस्ट मध्ये आपण YCMOU Exam 2022 कशी होणार आहे याबद्दल माहिती घेणार आहोत. परिस्थिती नॉर्मल होत असल्यामुळे परीक्षा ऑफलाईन होतील असी शक्यता वर्तवण्यात येत होती आणि त्यादृष्टीने विद्यापीठाने काही चर्चा करून एक सूचनापत्र जारी केले आहे.
YCMOU 2022 वार्षिक परीक्षा कधी होणार
दरवर्षी वार्षिक परीक्षा ही मे महिन्यात सुरु होऊन जून पर्यंत चालत असते परंतु विद्यापीठाकडून देण्यात आलेल्या सूचनापत्रामध्ये या वर्षीची वार्षिक परीक्षा ही जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरु होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी एक महिना जास्त मिळणार आहे.
YCMOU 2022 Exam Online होईल की Offline
आधीच्या ऑफलाईन पद्धतीपेक्षा मागील दोन वर्षात झालेल्या ऑनलाईन परीक्षा पद्धत अनेक विद्यार्थ्यांना आवडली कारण ऑनलाईन पद्धतीमध्ये विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रावर जाण्याची गरज नाही आणि कुठूनही परीक्षा देता येते. म्हणून यावेळेस सुद्धा ऑनलाईन परीक्षा व्हाव्यात असे अनेक जनांना वाटत असेल.
परंतु विद्यापीठाने या वर्षीची वार्षिक परीक्षा पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे ऑफलाईन पद्धतीनेच घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे परीक्षा केंद्रावर जावेच लागेल.
Time Table, Hall Ticket कधी उपलब्ध होईल
विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वेळापत्रक आणि प्रवेशपत्र कधी उपलब्ध होईल हे नविन सुचनापत्रामध्ये सांगण्यात आलेले नाही परंतु यासाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या वेबसाईटवर वेळोवेळी सूचना बघण्याचे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.
YCMOU Exam 2022 विषयी परीक्षा कधी होईल, ऑनलाईन की ऑफलाईन होईल, वेळापत्रक कधी मिळेल इत्यादी माहिती आपण या पोस्ट मध्ये घेतलेली आहे. त्यामुळे ही पोस्ट आपल्याला आवडली असेल अशी आशा करतो आणि जर का आपण आमचा युट्युब चॅनलला भेट दिली नसेल तर एकदा नक्की भेट द्या.
ऑफलाईन होणाऱ्या परीक्षेसाठी आतापासूनच सुभेच्छा!
0 टिप्पण्या