(SPPU SOL) शावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ Repeater Exam Form Date

SPPU

SPPU Exam Form Date Declared (SOL)

शावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशाळेमार्फत घेण्यात आलेल्या शैक्षणिक वर्ष 2020-21 परीक्षेचे निकाल काही दिवस आधीच लावण्यात आलेला आहे. या निकालामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला काही तक्रारी असतील तसेच अनुशेषित म्हणजेच Backlog साठी अर्ज कधी करायचे यासाठी विद्यापीठाने एक सूचनापत्र जारी केलेले आहे.

या सूचनापत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी काही सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्या आपण इथे बघणार आहोत. सर्वात आधी शैक्षणिक वर्ष 2020-21 च्या निकालामध्ये विद्यार्थ्याला काही तक्रार असल्यास विद्यार्थ्याने आपली तक्रार लेखी स्वरुपात आपल्या अभ्यासकेंद्रावर द्यायची आहे. ही लेखी तक्रार विद्यार्थ्याने 14 मार्च पर्यंत देणे आवश्यक आहे.

SPPU SOL Exam Form कधी फॉर्म भरता येतील

तसेच backlog म्हणजेच जर विद्यार्थ्याचे विषय सुटले नसतील (नापास झाले असतील) तर त्यांना विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईट वर त्यासाठी फॉर्म भारता येणार आहे. विद्यार्थ्याला backlog साठी फॉर्म भरायचा असल्यास विद्यापीठाकडून 25 मार्च 2022 ते 30 मार्च 2022 पर्यंत असे एकूण पाच दिवसांचा वेळ देण्यात आलेला आहे. या मुदतीमध्येच विद्यार्थ्याना Repeater Exam साठी फॉर्म भरता येणार आहेत.

Repeater Exam साठी फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे आणि ही परीक्षा बहुपर्यायी स्वरुपाची असेल. ऑनलाईन घेण्यात येणारी ही परीक्षा एप्रिल महिन्यात घेतली जाणार असून त्यासाठीचा वेळापत्रक नंतर विद्यापीठाच्या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या