YCMOU Duplicate Marksheet कसे मिळेल ?

जेव्हा नोकरी/काम करून शिक्षण पूर्ण करायचे असते तेव्हा आपल्यासारखे अनेक जन YCMOU चा आधार घेत असतात. कारण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे विद्यार्थ्यांना दूरस्थ शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देते.

विद्यापीठाच्या या सुविधेमुळे अनेक विद्यार्थी ज्यांना आर्थिक किंवा इतर कारणांमुळे नियमित शिक्षण घेता येत नाही असा विद्यार्थ्यांना खूप फायदा होत असताना आपण बघितले आहे.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामधून आपलं शिक्षण घेतल्या नंतर आपल्याला कुठेही वापरता येईल असे प्रमाणपत्र/मार्कशीट देण्यात येते. YCMOU ला UGC ची मान्यता असल्याकारणाने या विद्यापीठाकडून देण्यात येणारे प्रत्येक प्रमाणपत्र हे कायदेशीर ग्राह्य असते.

विद्यापीठाकडून देण्यात आलेल्या या प्रमाणपत्राचा वापर आपण खाजगी (Private) किंवा सरकारी (Govt.) नोकरी मिळविण्यासाठी करू सकता.

पण जर का आपल्याला मिळालेले हे प्रमाणपत्र/मार्कशीट हरवले तर ते विद्यापीठामधून कसे मिळवायचे हा प्रश्न आपल्याला पडलेला असेल; तर आपण अगदी योग्य ठिकाणी आहात. या पोस्टमध्ये आपण YCMOU Duplicate Marksheet कसे मिळेल यासाठीची माहिती बघणार आहोत.

Duplicate Marksheet मिळविण्यासाठी आपल्याला विद्यापीठामध्ये अर्ज करावा लागणार आहे त्याची Process खाली दिलेली आहे.

YCMOU Duplicate Marksheet

आपल्याला विद्यापीठातील "परीक्षा नियंत्रक" या विभागाला अर्ज लिहावा लागेल. या अर्जामध्ये आपल्याला खालील गोष्टींचा उल्लेख करावा लागणार आहे.

  • विद्यार्थ्याचे नाव
  • आईचे नाव
  • परीक्षेचे नाव
  • पास झाल्याचा महिना आणि वर्ष
  • ज्या कॉलेज मध्ये प्रवेश होता त्याचे नाव
  • आपला PRN
  • परीक्षेचा बैठक क्रमांक (Seat No.)
  • मिळालेले मार्क्स
  • आपला पत्ता
  • मोबाईल नंबर आणि ई-मेल इत्यादी

वरील सर्व माहितीचा उल्लेख करून अर्ज तयार झाल्यानंतर आपल्याला ज्या मार्कशीट/पासिंग चे Duplicate हवे असेल त्याची सत्यप्रत (Attested) केलेली झेरोक्स कॉपी जोडावी लागेल.

आपल्याला हव्या असलेल्या Duplicate Marksheet साठी रु.100 च्या Stamp Paper वर Affidavit करून घ्यावे लागेल. Affidavit लिहिलेल्या अर्जासोबत जोडावे लागणार आहे.

वरील सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आपल्याला रु. 200 एवढी Duplicate Marksheet फी सुध्दा भरावी लागणार आहे आणि भरलेली फी विद्यापीठाकडून परत देण्यात येत नाही.

यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करता येईल विद्यापीठाच्या वेबसाईटवर त्यासाठी लिंक देण्यात आलेली आहे. तसेच खालील लिंक वरून सुद्धा आपण त्या पोर्टल ला भेट देऊ सकता.

Apply Online

वर देण्यात आलेली लिंकचा आम्ही टेस्टिंग साठी वापर करून बघितला असता ती व्यवस्थित काम करत नव्हती त्यामुळे लिंकवरून ऑनलाईन अर्ज कसा करावा हे सांगता येणार नाही.

आपल्याला जास्त अडचणी येत असल्यास विद्यापीठाच्या हेल्पलाईनचा सुद्धा आपल्याला वापर करता येणार आहे.

पूर्ण अर्ज तयार झाल्यानंतर आपल्याला तो पोस्टाने सुद्धा पाठवता येईल. पोस्टाने अर्ज पाठवायचा असल्यास खालील पत्त्यावर पाठवू सकता.

अर्ज पाठविण्यासाठी पत्ता :

The Controller of Examinations

Yashwantrao Chavan Maharashtra Open University

Dnyangangotri Near Gangapur Dam, 

Nashik, Pin Code-422222, 

Maharashtra(India)

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या