विद्यार्थी आणि पुस्तक यांमधील ताळमेळ असा बसवा, हे नक्की जाणून घ्या

पुस्तक सांगितलं की कुणालाही शाळेतील दिवस किंवा आपण विद्यार्थी असतानाचे दिवस पटकन आठवण येतील. कारण विद्यार्थी आणि पुस्तक याचं नातं हे अतूट होतं आणि असणार आहे. पुस्तकं आपल्याला अनेक अनुभव, अनेक गोष्टी शिकवत असतात, म्हणूनच या पोस्ट मध्ये कोणत्याही विद्यार्थ्यासाठी पुस्तकं एवढी महत्वाची आणि गरजेची का आहेत तसेच यांच्यासोबत ताळमेळ कसा बसवायचा हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

सध्या अनेक विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रतेची कमी बघायला मिळत आहे आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे मोबाईल आणि इतर आधुनिक साधने यांचा अतिवापर. हो! अतिवापरच सांगावा लागेल कारण आपण शाळा-कॉलेज मधील विद्यार्थ्यांना एका ठिकाणी बसून तासनतास पबजी खेळताना बघितले असेल त्यांना जर कोणी मध्ये अडवले तर त्यांना त्याचा कंटाळा येतो.

यामधून बाहेर पडायचे असेल तर त्यासाठी सर्वात चांगला मार्ग म्हणजे वाचन आणि प्रामुख्याने चांगलं वाचन. चांगल्या वाचनाची सवय लागली तर इतर अडथळे अपोआप दूर होताना दिसतील.

खालील काही मुद्द्याच्या आधारे आपण विद्यार्थ्यांचे आणि पुस्तकांचे जीवन समजून घेऊया.

Books

चांगला विद्यार्थी कोण असतो

मुळात बघितले तर विद्यार्थी हा चांगला किंवा वाईट नसतोच. तो आकलन क्षमतेनुसार कमी अधिक हुशार असू शकतो. पण तरी सुध्दा विद्यार्थ्याने स्वत: एक नीती बनवून घेतली पाहिजे कारण प्रत्येकाच्या गरजेनुसार गोष्टी ह्या वाईट किंवा चांगल्या ठरत असतात, म्हणून विद्यार्थ्याने नेहमी आणि कुणाकडूनही शिकत राहण्याची प्रवृत्ती उराशी बाळगावी. या एकच गोष्टीणे विद्यार्थी श्रेष्ठ बनत असतो.

विद्यार्थ्याने काय करावे

समाजामध्ये नेहमी अनेक प्रश्न / समस्या तयार होत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत असा मध्ये विद्यार्थ्यांच्या नावावर किंवा विद्यार्थी या शब्दाला कुणी वाईट सांगणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. सोबतच सतत शिकण्याच्या प्रवृत्तीमुळे समाजामध्ये आपण काही चांगले करता येईल का याकडे लक्ष देणे सोपे होते.

 विद्यार्थ्याने नेहमी अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण सध्या अनेक विद्यार्थी चुकीच्या मार्गाने दिसत आहेत आणि त्यामुळेच त्यांच्यामध्ये वाईट प्रवृत्ती तयार होत आहेत. 

विद्यार्थी आणि पुस्तक यांचा संबंध

पुस्तके नेहमी मजेदार माहिती आणि किस्से घेऊन येत असतात. या पुस्तकांमुळेच माणसाला नवनवीन गोष्टी माहिती होत असतात. जसे जेव्हा आपण विद्यार्थी बनून प्राथमिक शिक्षण घेतो तेव्हा आपल्याला लिहिण्या - वाचण्याची कुवत तयार होते.

म्हणूनच विद्यार्थी आणि पुस्तक यांचा संबंध खूप जुना आहे असे सांगता येईल. कारण विद्यार्थ्यांशिवाय पुस्तकाला महत्व नाही आणि पुस्तकाशिवाय विद्यार्थी शिकू शकत नाही. म्हणूनच हे दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहेत.

पुस्तक वाचण्याची पध्दत

आपण आयुष्यात जसं-जसं वयाची पायरी चढतो तसे पुस्तके आणि त्यांना वाचण्याच्या पध्दती शुध्द बदलत असतात. उदाहरण घ्यायचे झाले तर प्राथमिक शाळेत पुस्तके कमी आणि पातळ असतात मात्र कॉलेज पर्यंत येता येता त्याच पुस्तकांची संख्या आणि जाडी सुध्दा वाढलेली असते. म्हणूनच त्यांच्या वाचण्याच्या पध्दती सुद्धा वेगळ्या आहेत.

काही पुस्तके ही पाठ पूर्ण होईपर्यंत वाचावी लागतात तर काही पुस्तके ठराविक वेळीच आणि ठराविक मुद्देच वाचावे लागतात, तेव्हाच आपल्याला त्या पुस्तकामधला मुद्दा किंवा लेखकाला काय सांगायचे आहे ते समजते.

पुस्तकांचं कार्य

पुस्तकांच्या कार्याबद्दल बोलायचे झाले तर हा पूर्ण पोस्ट तुम्ही वाचणार नाही म्हणून थोडक्यात बघूया. पुस्तके ही वेगवेगळ्या स्वरुपात आपल्याला बघायला मिळतात जसे पाठ्यपुस्तक, ग्रंथ, काव्य इत्यादी.

या पुस्तकांमुळेच आपल्याला मागील इतिहास, आपला भूगोल, आपल्या भविष्याची छवी इत्यादी गोष्टीची जाणीव होते म्हणून पुस्तकांचं कार्य माणसाच्या जीवनात खूप महत्वाचं असतं

पुस्तक आणि विद्यार्थी यामध्ये ताळमेळ कसा बसवायचा

सध्या विद्यार्थी पुस्तकांपासून खूप दूर होत आहेत आणि त्याचे कारण आपल्याला माहिती असेलच. काही विद्यार्थ्यांना लागलेली ऑनलाईन खेळांची सवय ही खूपच विकृतीमय बनलेली आहे. म्हणूनच मोबाईल आणि इतर आधुनिक साधनांचा वापर प्रत्येक विद्यार्थ्याने विचारपूर्वक करायचा आहे.

या सर्व गोष्टींमधून बाहेर पडायचे असेल तर पुस्तकांसोबत मैत्री केली पाहिजे, यामुळे आपला वेळ वाया जाणार नाही आणि चांगल्या सवयी लागत जातील. पुस्तक वाचनाची सवय लावून घ्यायची असेल तर दिवसातून कमीत एक पान तरी नक्की वाचवा. यानंतर हळू-हळू जास्त पण वाचण्याची सवय आपोआप होईल.

गोड शेवट

तसे पाहता या सर्व गोष्टी ज्या तुम्ही वाचल्या या लिहिण्यासाठी आम्हाला पुस्तकांची खूप मदत झाली, असे अनेक पोस्ट पुढेही येणार आहेत आणि त्यामध्ये सुध्दा पुस्तकांचा वाटा खूप मोठा असणार आहे. यावरून पुस्तकांचं महत्व तुमच्या लक्षात येईल. विद्यार्थी आणि पुस्तक यांच्याविषयीच्या या लेखामध्ये थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला थोडी तरी मदत झाली तर आम्हाला खूप आनंद होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या