(YCMOU) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ पुनर्परीक्षार्थी अर्ज (Repeater Form) प्रक्रिया सुरु
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे (YCMOU) चे विद्यार्थी येणाऱ्या परीक्षेसाठी तयार असणारच आहेत किंवा ज्यांना तयारी करायची आहे त्यांनी आता सुरुवात करून घ्यावी. पण ज्या विद्यार्थ्यांचे विषय राहिलेले असतील म्हणजेच ATKT असेल असा विद्यार्थ्यांनी जास्त लक्ष देणे गरजेचे आहे कारण त्यांना राहिलेल्या विषयांचे पुनर्परीक्षा अर्ज भरून घ्यावेत लागतील.
YCMOU कडून पुनर्परीक्षेसाठी अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया 5 जुलैपासून सुरु असणार आहे आणि हे अर्ज त्यांच्या संकेतस्थळावरून (Website) भरले जातील. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे विषय राहिलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावेत. काही विद्यार्थी फॉर्म भरण्याची मुदत भरपूर आहे या विचाराणे दुर्लक्ष करतात आणि नंतर फॉर्म भरायचा राहून जातो त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याने दुर्लक्ष न करता लगेच फॉर्म भरून घ्यावा. फॉर्म भरण्याची शेवटची दिनांक 25 जुलै 2021 ही आहे तरीसुद्धा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावेत. अर्ज करण्यासाठी खाली असणाऱ्या Apply Online वर क्लिक करू शकता.
हे पण बघा : YCMOU अभ्यासक्रमाची ची पुस्तके आपल्या मोबाईल मध्ये Download करून घ्या
- B.A, B.Com किंवा यासारख्या इतर पदवी किंवा पदविका किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या प्रत्येक पेपर साठी 130 रुपये असणार आहेत.
- पदव्युत्तर पदवी व्यावसायिक/तांत्रिक/सायन्स च्या प्रत्येक पेपर साठी 150 रुपये.
- प्रात्यक्षिक साठी 200 रुपये प्रती पेपर
- प्रत्येक वर्षाच्या मार्कशीट साठी 100 रुपये मोजावे लागणार आहेत.
अधिक माहितीसाठी विद्यार्थांनी विद्यापीठाच्या वेबसाईटला भेट द्यावी.