WhatsApp ची लोकप्रियता एवढी वाढलेली आहे की, आज WhatsApp नसलेला एकही स्मार्ट फोन आपल्याला बघायला मिळणार नाही. WhatsApp ने सुरु केलेली Statuses या सुविधेमुळे तर आणखीनच जास्त लोकप्रियता
मिळविलेली आपल्या बघायला मिळू शकते.
WhatsApp वर Status म्हणून आपण कोणताही फोटो किंवा व्हिडीओ
पोस्ट करू शकतो त्यामुळे याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. जगभरातील
लोकं प्रत्येक महत्वाचा किंवा आनंदाचा क्षण आपल्या WhatsApp वर Status म्हणून पोस्ट करत आहेत. त्यापैकी काही
आपले नातेवाईक किंवा मित्र पण असतील. WhatsApp Status हे फक्त 24 तासांपर्यंत दिसत
असतात त्यानंतर ते उडून जातात.
कधी कधी त्या Statuses मध्ये आपल्या काही आठवणी किंवा जिव्हाळा लपलेला असतो. असा
वेळेस आपल्याला तो Status सेव करून ठेवावा असे वाटते पण त्यासाठी WhatsApp कडून कुठलीही सुविधा देण्यात आलेली नाही
म्हणून आपण त्यासाठी Play Store वरील एखाद्या App चा वापर करतो.
पण WhatsApp वरील Statuses कोणत्याही App चा वापर न करता सेव करता येऊ शकतात. WhatsApp Statuses सेव करण्यासाठी खाली दिलेल्या कृती समजून
घ्या.
- सर्वप्रथम आपल्याला जो Status सेव करायचा असेल तो पूर्ण बघून
घ्या. कारण जर आपण status पूर्ण बघितला नाही तर तो सेव करता
नाही येणार.
- आता आपल्या फोन मधील File Explorer किंवा File Manager जो असेल तो ऑपन करा.
- नंतर आपल्या फोन मधील Internal Storage मध्ये जा.
- Internal Storage मध्ये स्क्रोल करून एकदम खाली या व WhatsApp नावाचा Folder ऑपन करा.
- WhatsApp Folder मध्ये तीन Folder दिसतील त्यापैकी Media हा Folder ऑपन करा.
- Media या Folder मध्ये आल्यानंतर आपल्या स्क्रीन वरील वरच्या बाजूला
उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या तीन dots (तीन टिंब) वर क्लिक करा आणि नंतर Settings या पर्यायावर क्लिक करा.
- आता आपल्यासमोर Show hidden files हा पर्याय दिसेल त्याच्या समोरील
चौकोनावर क्लिक करा (चौकोनावर टिक करा.) आणि तिथून मागे (Back) या.
- मागे आल्यावर .Statuses नावाचा Folder दिसेल तो ऑपन करा.
- आता आपल्यासमोर WhatsApp मधील Status बघायला मिळतील. जो status आपल्याला सेव करायचा असेल तो या
ठिकाणावरून कॉपी करून इतर ठिकाणी सेव करून घ्या.
असा पध्दतीने आपण आपण WhatsApp Statuses सेव करून ठेवू शकता. WhatsApp Statuses आपल्या फोनमध्ये आधीपासूनच Download झालेले असतात त्यासाठी कोणत्याही इतर App वापरण्याची आवश्यकता नसते.
status सेव करून झाल्यानंतर परत settings मध्ये जाऊन Show hidden files या पर्यायाला Disable म्हणजेच त्याच्यासमोर असलेली टिक काढून टाका.
ही ट्रिक आपल्याला कसी वाटली ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्स
मध्ये कमेंट करून आम्हाला नक्की कळवा किंवा आपल्याकडे एखादी ट्रिक असेल तर ती खाली
कमेंट करून आमच्यासोबत शेयर करा.
या विषयीचा आमच्या युट्युब चॅनल वरील खाली दिलेला व्हिडीओ
बघा.
0 टिप्पण्या