Video Share करा MX Player चा वापर करूनvideo share करण्यासाठी आपण आतापर्यंत वेगवेगळ्या App चा वापर केलेला असेल पण MX Player चा वापर करूनही video इतरांसोबत share करता येतात हे कदाचित आपल्याला माहिती नसेल. त्यामुळे इथे आपण MX Player चा वापर करून video इतरांना कसा द्यायचा किंवा इतरांकडून कसा घ्यायचा हे बघणार आहोत. त्यामुळे शेवट पर्यंत नक्की वाचा व खाली दिलेला video सुध्दा बघा.

आता काही दिवसांपूर्वीच MX Player कडून एक नविन Update देण्यात आलेला आहे. या Update नुसार आपण आपल्या इतर मित्रांसोबत Video Share करू शकणार आहे. Video Share करण्यासाठी दुसऱ्या मोबाईल मध्ये सुध्दा MX Player असणे गरजेचे आहे.
MX Player चा वापर करून video कसा share करायचा ते खाली दिलेलं आहे.
सर्वात अगोदर आपल्या मोबाईल मधील MX Player Update करून घ्या व नंतर खालील स्टेप फॉलो करा.
  • MX Player ऑपन करा.
  • स्क्रिनच्या वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात असणाऱ्या D चिन्ह (MX share) असणाऱ्या बटणवर क्लिक करा. (किंवा डाव्या बाजूला असणाऱ्या तीन रेषांवर क्लिक करून File Transfer हा पर्याय निवडा)
  • जर आपल्याला video share करायचा असेल तर Send या बटणवर क्लिक करा व video निवडून share now या बटणवर क्लिक करा. विचारण्यात येणाऱ्या सर्व Permission ला Allow करा.
  • जर video दुसऱ्या मोबाईल मधून आपल्या मोबाईल मध्ये घ्यायचा असेल तर Receive या बटणवर क्लिक करा.
समजून घेण्यासाठी खालील video बघा व माझ्या Ajay Chaitya EduTech या YouTube Channel ला Subscribe करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या