MPSC मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021
MPSC मार्फत PSI, STI आणि ASO साठी संयुक्तपणे घेतली जाणारी पूर्व परीक्षा जाहीर करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदांसंबंधित जागा, शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता इत्यादी माहिती खाली दिलेली आहे. या ठिकाणी सर्व माहिती दिलेली असली तरी सुध्दा अर्ज करण्याआधी मुख्य जाहिरात नक्की तपासून बघा.
परीक्षेचे नाव : महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021
जाहिरात क्रमांक : 249/2021
एकूण जागा : 666
सहाय्यक कक्ष अधिकारी (गट - ब)
पदसंख्या : 100 जागा
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी असणारा उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतो तसेच पदवीच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या उमेदवारालाही या परीक्षेसाठी अर्ज करता येईल.
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय हे 01 फेब्रुवारी 2022 रोजी कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 38 वर्षे असावे. (मागासवर्गीय व अनाथांना 5 वर्षे सूट असेल)
राज्य कर निरीक्षक (गट - ब)
पदसंख्या : 190 जागा
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी असणारा उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतो तसेच पदवीच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या उमेदवारालाही या परीक्षेसाठी अर्ज करता येईल.
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय हे 01 फेब्रुवारी 2022 रोजी कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 38 वर्षे असावे. (मागासवर्गीय व अनाथांना 5 वर्षे सूट असेल)
पोलीस उपनिरीक्षक (गट - ब)
पदसंख्या : 376 जागा
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी असणारा उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतो तसेच पदवीच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या उमेदवारालाही या परीक्षेसाठी अर्ज करता येईल.
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय हे 01 फेब्रुवारी 2022 रोजी कमीत कमी 19 आणि जास्तीत जास्त 31 वर्षे असावे. (मागासवर्गीय व अनाथांना 5 वर्षे सूट असेल)
शारीरिक पात्रता :
पुरुष : या पदासाठी उमेदवाराची उंची 165 से.मी. असणे आवश्यक आहे तसेच छाती न फुगवता 79 व फुगवून 5 से.मी जास्त असणे आवश्यक आहे.
महिला : उमेदवाराची उंची 157 से.मी असणे आवश्यक आहे.
हे पण बघा : MPSC PSI Books List
Fee : परीक्षा शुल्क हे खुल्या प्रवर्गासाठी रु. 394/- तर मागासवर्गीय & अनाथांसाठी रु. 294/- एवढी असेल.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 19 नोव्हेंबर 2021
परीक्षेची दिनांक : 26 फेब्रुवारी 2022
0 टिप्पण्या