ऑनलाईन मिळणार YCMOU पदवी प्रमाणपत्र
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आतापर्यंत पदवी पूर्ण झाल्यानंतर पदवी प्रमाणपत्र अभ्यासकेंद्रामार्फत मिळत होते.
परंतु जोपर्यंत प्रमाणपत्र अभ्यासकेंद्रात उपलब्ध होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राची वाट पहावी लागत होती.
आता मात्र तसं होणार नाही कारण विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने मिळणार असल्याने ते विद्यार्थ्यांना लवकर मिळतील.
हे पण बघा : YCMOU Migration? का आणि कधी गरज भासते?
विद्यापीठाकडून या वर्षापासून पदवी प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना फॉर्म मध्ये आधार नंबर दिला होता असाच विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे, कारण प्रमाणपत्र डिजीलॉकरच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
पहिल्या टप्प्यामध्ये मे 2019 आणि मे 2020 मध्ये झालेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या एकूण 2 लाख 90 हजार विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.
उर्वरित विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र सुध्दा टप्प्या-टप्प्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
विद्यार्थ्यांना ऑनलाईन पदवी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी डिजीलॉकरचा वापर करावा लागणार आहे.