MPSC New Update
MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी मागील काही काळापासून www.mahampsc.mahaonline.gov.in या वेबसाईटचा वापर केला जात होता. परीक्षेसंबंधित सर्व माहिती याच वेबसाईटवर उपलब्ध करण्यात येत होती. परंतु आता सर्व विद्यार्थी मित्रांना नविन वेबसाईटचा वापर करावा लागणार आहे.
मागील काही दिवसांमध्ये MPSC साठी https://mpsconline.gov.in/ ही नविन वेबसाईट सुरु करण्यात आलेली आहे. आता यापुढे MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांचे फॉर्म या नविन वेबसाईटवरून भरले जाणार आहेत.
हे पण बघा: MPSC PSI Books List
पण त्यासाठी ज्यांनी आधीच्या वेबसाईटवरून Registration केले होते त्यांना नविन वेबसाईटवर आपली प्रोफाईल अपडेट करावी लागणार आहे.
नविन वेबसाईटवर प्रोफाईल अपडेट करण्यासाठी विद्यार्थ्यांना काही अपूर्ण माहिती सुध्दा भरावी लागणार आहे. त्यामुळे सर्व माहिती लक्षपूर्वक तपासून बघा.
विद्यार्थ्यांनी आपली प्रोफाईल अपडेट करण्यासाठी सर्वात आधी https://mpsconline.gov.in वेबसाईटवर जाऊन Forgot/Reset Password या बटणवरून आपला पासवर्ड बदलून घ्यावा लागेल.
पासवर्ड बदलून झाल्यांनतर विद्यार्थ्यांना आपल्या रजिस्टर मोबाईल किंवा ई-मेलचा वापर करून लॉगीन करता येणार आहे.
वर दिलेल्या लिंक वरून वेबसाईटला भेट द्या आणि आपली प्रोफाईल अपडेट करून घ्या जेणेकरून पुढील येणाऱ्या जाहिरातीसाठी आपली प्रोफाईल पूर्णपणे तयार असेल.
ही पोस्ट आपल्या किती उपयोगात आली ते नक्की कमेंट करा.
0 टिप्पण्या