सेट परीक्षा सप्टेंबर २०२१ जाहीर !
पदव्युत्तर पदवी (Post Graduation) पूर्ण करून प्राध्यापक होण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या वर्षीची SET Exam 2021 आलेली आहे. या विषयीची official notification सेट परीक्षेच्या मुख्य वेबसाईटवर प्रशिद्ध करण्यात आलेली आहे.
या परीक्षेसाठी पदव्युत्तर पदवी (Post Graduation) पूर्ण असलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात. तसेच पदव्युत्तर पदवीच्या दुसऱ्या किंवा शेवटच्या वर्षामध्ये असलेले विद्यार्थी शुद्धा अर्ज करण्यास पात्र आहेत.
परंतू पदव्युत्तर पदवीच्या पहिल्या वर्षामध्ये असलेले विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र नसतील त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज करू नये.
परीक्षेसाठीचा अर्ज मुख्य वेबसाईट वरून दिनांक 17 मे 2021 सकाळी 11 वाजता पासून भरता येणार आहे. अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट कुठेही पाठवू नये ती आपल्याकडेच व्यवस्थित सांभाळून ठेवावी.
परीक्षेविषयी काही महत्वाच्या गोष्टी :
अर्ज करण्याची दिनांक : 17 मे 2021 सकाळी 11 वाजता पासून
अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 10 जून 2021 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत
परीक्षा फी
खुला प्रवर्ग : 800/-
राखीव प्रवर्ग : 650/-
ऑनलाईन अर्ज करा : Apply Online
0 टिप्पण्या