12 हजार पेक्षा जास्त जागांसाठी लवकरच पोलीस भरती होणार
16 सप्टेंबर रोजी झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत राज्यात सुमारे 12,500 जागांसाठी पोलीस भरती होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतः याविषयीची माहिती माध्यमांना दिली. काही दिवसांमध्ये या भरती विषयी GR सुध्दा प्रकाशित होईल. ही भरती एकत्रितपणे घेण्यात येणार आहे त्यामुळे भरती साठी इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच तयारी सुरु करून द्यायला हवी. अनेकांनी तयारी सुरु केलेली सुध्दा असेल पण ज्यांनी आपली भरतीसाठीची तयारी थांबवली असेल त्यांनी परत सुरु करून घ्या.
हे पण वाचा : पोलीस भरती साठी कोणती पुस्तके वाचावी?
ही भरती मोठी असल्यामुळे स्पर्धाही मोठीच होईल यामध्ये काही शंका नाही त्यामुळे आपल्याला तयारी साठी पुस्तके लागतील तर ती आपण जवळच्या दुकानातून मिळवू शकता किंवा ऑनलाईन ऑर्डर करू शकता.
याठिकाणी मी आपल्यासाठी काही पुस्तके देत आहे आपण ती ऑनलाईन ऑर्डर करू शकता. ऑर्डर करण्यासाठी पुस्तकावर क्लिक करा.
0 टिप्पण्या