कोरोनानंतर सारी आजार | काय आहे सारी, वाचा येथे....

सारी या आजाराविषयी माहिती

कोरोना महामारीचे संकट वाढत असताना आता यामध्ये सारी (Severe Acute Respiratory Infection) आजाराची भर पडलेली आहे. काल टिव्ही बघत असताना एक बातमी बघितली. औरंगाबादमध्ये हा आजार दिसून आलेला आहे आणि या आजारामुळे गेल्या दहा दिवसांत दहा जणांचा मृत्यूही झालेला आहे. म्हणून आजच्या पोस्ट मध्ये या आजाराविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत.
सारी हा श्वासनासंबंधीचा आजार आहे. ज्याला Severe Accute Respiratory Infection असे सांगितले जाते. या आजारामध्ये व्यक्तीला सर्दी, खोकला असतो सोबतच त्या व्यक्तीला श्वास घेण्यास खूप त्रास होत असतो. हा आजार संसर्गजन्य असून संपर्कातून पसरत असतो. 
हा आजार एक प्रकारचा इन्फेक्शनच आहे. याची लक्षणे कोरोनासारखीच आहेत त्यामुळे या व्यक्तीला कोरोनाही असू शकतो. सध्या सारीची लागण झालेल्या व्यक्तीची कोरोना चाचणी होणेही गरजेचे आहे. या आजाराची लक्षणे पुढील प्रमाणे असू शकतात.

1) श्वास घेण्यास त्रास होणे.

2) खूप ताप, सर्दी, खोकला.

3) फुफ्फुसात सूज येणे.

4) कमी वेळेत रुग्ण गंभीर अवस्थेत जातो.

5) वृद्ध व्यक्ती, लहान मुले आणि रोगप्रतिकारक क्षमता कमी असलेल्या व्यक्तींमध्ये लवकर पसरतो. 

या आजारापासून बचावासाठी काळजी घेणे हा एक चांगला उपाय आहे. खालील काही गोष्टी लक्षात ठेवू शकता.

1) सार्वजनिक ठिकाणावरून आल्यावर आपले हात व्यवस्थित धुवून घ्या.

2) शिंका येत असतील तर नाकावर रुमाल किंवा कपडा ठेवा.

3) आपल्या चेहऱ्याला हात लावू नका विशेषतः डोळे आणि तोंडाला स्पर्श करू नका.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या