Pink Super Moon
परत एकदा सुपर मुन बघण्याची संधी मिळणार आहे. या वर्षी भारतीय वेळेनुसार सकाळी 8:05 वाजता सुपर मुन दिसणार आहे. सुपर मुन म्हणजेच हा चंद्र या वर्षीचा सर्वात मोठा आणि जास्त चमकदार असणार आहे, त्यामुळे अनेक जण या सुपर मूनला बघण्याची संधी सोडणार नाही.
हे पण बघा : भारतातील सर्वात मोठी Online Library
हे पण बघा : भारतातील सर्वात मोठी Online Library
एप्रिल महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला गुलाबी चंद्र म्हणजेच पिंक मुन असे सांगितले जाते. या वार्षिक एप्रिल मधील पौर्णिमेच्या दिवशी सुपर मुन दिसणार आहे आणि त्यामुळेच याला पिंक सुपर मुन सांगितले जाईल. परंतु ही घटना भारतामधून बघता येणार नाही कारण ही घटना भारतीय वेळेनुसार सकाळी 8:05 वाजत होणार आहे.
या वेळेस सूर्याच्या किरणांमुळे प्रकाश/उजेड जास्त असेल आणि त्यामुळेच सुपर मुन बघता येणार नाही, पण तरीही इंटरनेटच्या माध्यमातून ही घटना ऑनलाईन बघता येणार आहे. Slooh आपल्या युट्युब चॅनेल वर ही घटना live दाखवणार आहे. आपण त्यांच्या चॅनेल वरून ही घटना बघू शकता.
आता सुपर मुन विषयी थोडक्यात माहिती बघूया. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या कक्षाच्या खूप जवळ येतो तेव्हा पृथ्वीवरून चंद्राचा आकार खुप मोठा आणि जास्त चमकदार दिसतो. त्यामुळेच त्या दिवशी दिसणाऱ्या चंद्राला सुपन मुन सांगितले जाते.
हे पण बघा : YCMOU Repeater exam May 2020
हे पण बघा : YCMOU Repeater exam May 2020
आपल्याला माहिती असेलच की, सामान्यपणे चंद्र आणि पृथ्वी यांच्या मधील अंतर हे 3 लाख 84 हजार कि. मी. एवढे असते. मात्र 8 एप्रिल रोजी हे अंतर 3 लाख 56 हजार नऊसे सात एवढे असेल. म्हणजेच या दिवशी चंद्र आणि पृथ्वी यांच्यामधील अंतर 27,093 कि. मी. एवढे कमी असेल. त्यामुळे चंद्र जास्त मोठा आणि अधिक चमकदार दिसेल. त्यामुळेच यासारख्या दिवशी दिसणाऱ्या चंद्राला सुपर मुन सांगितले जाते.
एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी ती म्हणजे, प्रत्येक वेळेस पौर्णिमेला सुपर मुन दिसेलच असे नाही, आणि सुपर मुन पौर्णिमेलाच दिसतो असेही नाही. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल तेव्हाच सुपर मुन दिसतो. त्यावेळेस अर्ध चंद्र किंवा चंद्राची इतर स्थितीही असू शकते.
0 टिप्पण्या