सावधान ! आपल्या मोबाईलवर हॅकर्सचा डोळा.....

हॅकर्सच्या हालचालींमध्ये वाढ

देशामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा-सुविधा बंद आहेत. कंपन्या, कार्यालये तसेच इतर कामेही बंद आहेत आणि त्याचे कारण म्हणजे कोरोनामुळे घोषित करावा लागलेला लॉकडाऊन . लॉकडाऊनमुळे सर्वांनाच घरी बसावे लागले आहे तर काही जणांच्या नोकऱ्याही गेलेल्या आहेत. असे असले तरी सुद्धा एक असा वर्ग आहे ज्यांच्या कामामध्ये वाढ झालेली आहे आणि ते दिवसरात्र काम करीत आहेत. पण हे काम सामान्य लोकांच्या हिताचे नसून त्यांना फसविण्याचे आहे आणि हे काम करीत आहेत हॅकर्स.


फक्त आपल्या देशाचा विचार केला तरी गेल्या काही आठवड्यांत हॅकर्सच्या हालचालींमध्ये 20 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झालेली आहे. लॉकडाऊनच्या या काळात सामान्य लोकांना फसविण्यासाठी हॅकर्स नवनवीन शक्कल लढवत आहेत. 


लॉकडाऊनमुळे मोबाईल इंटरनेट वापरात वाढ झालेली आहे. सर्व मोबाईल वापरकर्ते इंटरनेटच्या माध्यमातून मनोरंजन, शिक्षण, खेळ किंवा काही शोधत आहेत याचाच फायदा हॅकर्स घेत असल्याचे दिसून आलेले आहे.


हॅकर्स वेगवेगळ्या पद्धती वापरत आहेत त्यापैकी काही पुढीलप्रमाणे आहेत. एखादी गोष्ट मोफत मिळत असल्याचे सांगून ती मिळवण्यासाठी लिंक शेयर करणे. या लिंक वर क्लिक करताच आपल्याकडून मोबाईल नंबर, नाव, पत्ता, जन्म दिनांक इत्यादी माहिती मागितली जाते किंवा लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्या नकळत आपल्या मोबाईल मध्ये एक ऍप डाऊनलोड होतो व ते ऍप आपली सर्व वैयक्तिक माहिती जसे आपल्या मोबाईल मधील फोटो, व्हिडीओ, मोबाईल नंबर्स, बँकेची माहिती इत्यादी हॅकर्सकडे पाठविण्याचे काम करते.


या सारख्या एक ना अनेक पद्धतींचा वापर हॅकर्सकडून केला जात आहे. त्यामुळे असा कोणत्याही Free च्या लिंकवर क्लिक करू नका तसेच अविश्वसनीय किंवा अनोळखी वेबसाईटवर जाऊ नका. कोणतीही लिंक शेयर करताना काळजी घ्या. कोरोनापासून तर सावध राहायचंच आहे परंतु Social Media आणि मनोरंजनाच्या नादात हॅकर्सच्या जाळ्यात अडकणार नाही याचीही काळजी घ्यावी लागेल.

Free Recharge च्या नावाने कशी फसवणूक होते ते आमच्या युट्युब चॅनल वरील खालील व्हिडीओ मध्ये बघा आणि चॅनल Subscribe करून इतरांसोबत सुद्धा शेयर करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या