या App मधून एकाच वेळी 12 जण करू शकतील Video Calling

Google Duo कडून मोठा बदल

कोरोनाच्या तावडीत आपण सापडू नये म्हणून कुणीही आपल्या घरांमधून बाहेर पडत नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये आपले मित्र-मैत्रीणी, नातेवाईक किंवा आपल्या जिवलग व्यक्तींसोबत संपर्क साधण्यासाठी मोबाईल खूप महत्त्वाचा घटक बनलेला आहे. अनेक जण Video Calling च्या माध्यमातूनही आपल्या जवळच्या व्यक्तींशी संपर्क साधत असतील. त्यामूळेच गुगलने आपल्या Google Duo या App मध्ये मोठा बदल केलेला आहे.


Google Duo द्वारे आधी एकाच वेळी 8 जण video calling करू शकत होते. आता मात्र यामध्ये गुगलने बदल केलेला आहे. आता या App च्या माध्यमातून एकाच वेळी 12 जण video calling करू शकतील. त्यामुळे लॉकडाऊनच्या या काळात आपण एकाच वेळी आपल्या बारा मित्र-मैत्रिणी किंवा नातेवाईकांसोबत समोरासमोर गोष्टी करू शकणार आहेत. 


या फिचरसाठी आपल्याला कोणतीही सेटिंग करावी लागणार नाही. आपण सरळ-सरळ 11 व्यक्तींना गृपमध्ये Add करून video calling सुरू करू शकता.

हा app play store वर उपलब्ध आहे तेथून डाऊनलोड करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणी किंवा नातेवाईकांचा गृप तयार करून त्यांच्यासोबत मनसोक्त गप्पा मारा आणि घरातच राहा.

हे पण बघा : केंद्र सरकार कडून शेतकऱ्यांसाठी नवीन मोबाईल ऍप

या app विषयी आपले मत कमेंटच्या माध्यमातून मांडा आणि काही प्रश्न असतील तर तेही कमेंट करू शकता. सोबतच आमचा युट्युब चॅनल सुद्धा Subscribe करा. Facebook आणि Instagram वर सुद्धा आम्ही आहोत तेथेही follow करायला विसरू नका.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या