लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचा अभ्यास थांबू नये म्हणून महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषदेमार्फत इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अभ्यास सुरू केलेला आहे. विद्यार्थ्यांना विविध विषयाचा अभ्यास करता येणार आहे.
राज्यातील शाळा बंद असल्या तरी अनेक शाळांमार्फत विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. तसेच काही शाळांकडून नियमित ऑनलाईन वर्ग घेतले जात आहेत. त्यामुळे काही विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरूच आहे. राज्यातील शिक्षण विभागाच्या पुढाकाराने सर्व विषय व माध्यमांसाठी ऑनलाईन अभ्यासमाला आयोजित केलेली आहे.
शाळा बंद असल्या तरी विद्यार्थी घरी राहून पालकांकडून काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु आता दिक्षा ऍप च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दररोज ऑनलाईन पद्धतीने शालेय अभ्यासक्रमाची तयारी करता येणार आहे. दिक्षा ऍप प्ले स्टोर वर उपलब्ध आहे तेथून डाऊनलोड करता येईल. पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अभ्यासमाला यामाध्यमातूनच सुरू आहे. ऍप डाऊनलोड करून नक्की वापर करावा.
आमच्या ब्लॉग वरील पोस्ट्स आवडत असतील तर भेट देत राहा, तसेच आपण आमचा Ajay Chaitya EduTech हा चॅनल Subscribe करून Facebook व Instagram वरही follow करा.
0 टिप्पण्या