कोरोना लक्षणांची तपासणी करता येणार ऑनलाईन

Covid-19 Self Assessment Tool from Maharashtra Govt

कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले असताना भारतात आणि आपल्या महाराष्ट्रामध्येही दिवसेंदिवस नवीन रुग्ण आढळून येत आहेत. या आजाराशी लढा देण्यासाठी शासन वेळोवेळी वेगवेगळे निर्णय घेत आहेत आणि त्यास नागरीकांकडूनही सहकार्य मिळत आहे. शासन आणि नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नानेच या महाआजारावर मात करता येणे शक्य आहे. लॉकडाऊन तर आधीपासूनच आहे पण तरी सुद्धा काही नागरिक गर्दी करताना दिसत आहेत म्हणुन आपल्याला विनंती की आपणही अशी हलगर्जीपणा करु नका. 
शासनाकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमध्ये आणखी भर पडलेली आहे. महाराष्ट्र शासनाने नागरिकांसाठी Self Assessment Tool नावाने एक वेबसाईट तयार केली आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला कोरोनाच्या प्राथमिक लक्षणांची तपासणी करता येणार आहेत. https://covid-19.maharashtra.gov.in म्हणून ही वेबसाईट आहे. 

वेबसाईटवर काही प्रश्न विचारण्यात येतील त्या प्रश्नांची योग्य ती उत्तरे दिल्यास त्यानुसार आपल्याला सूचना देण्यात येतील. त्यामुळे आता आपल्याला कोरोनाच्या लक्षणांची ऑनलाईन तपासणी करता येणार आहे. सर्वांना विनंती कोणत्याही ठिकाणी गर्दी करू नका. घरीच राहा ! सुरक्षित राहा !
या वेबसाईटचा वापर कसा करायचा याविषयीचा आमच्या YouTube चॅनेल वरील खालील video बघा, आणि येणारे पुढील videos बघण्यासाठी चॅनेल Subscribe करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या