Pan Card - Aadhar Card Linking Deadline
आयकर विभागाकडून (Income Tax Department) सोमवारी नागरिकांसाठी Pan Card आणि Aadhar Card संदर्भात एक सूचना देण्यात आलेली आहे. या सूचनेनुसार ज्यांच्याकडे Pan Card आहे त्यांनी आपला Pan Card Aadhar Card सोबत लिंक करणे अनिवार्य असल्याचे सांगितले आहे आणि 31 मार्चच्या आधी हे करून घेण्याचा सल्लाही दिला आहे.
आयकर विभागाने आधीच सांगितलेले आहे की जर आपण Pan Card आणि Aadhar Card लिंक केले नाही तर आपला Pan Card बंद होईल.
आपल्या Pan Card ला Aadhar Card शी 31 मार्च 2020 च्या आधी लिंक करणे अनिवार्य आहे कारण Pan आणि Aadhar लिंक करण्याची ही शेवटची संधी आहे. हे काम आपण Biometric Authentication द्वारे तसेच NSDL आणि UTITSL च्या सर्विस सेंटर वर जाऊन करू शकता. असे विभागाने twitter वर टाकलेल्या आपल्या पोस्ट मध्ये सांगितले आहे.
Aadhar Card लिंक करून घेणे भविष्यातील व्यवहार करण्याच्या दृष्टीचे फायदेशीर असणार आहे.
आधार लिंक करण्यासाठी दोन पद्धतींचा वापर करता येईल. त्या पद्धती खाली दिलेल्या आहेत त्यापैकी कोणतीही पध्दतीचा वापर करून आपण आपला Pan Card आणि Aadhar Card लिंक करून घेऊ शकता.
SMS द्वारे : आपण 567678 किंवा 56161 वर SMS पाठवून Pan आणि Aadhar लिंक करू शकता. SMS खाली दिलेल्या Format मध्ये लिहून वरीलपैकी कोणत्याही एका नंबर वर पाठवा.
UIDPAN<space>Aadhar Number<space>Pan Number.
उदा. UIDPAN AAAAAAAAAAAA PPPPPPPPPP (A च्या ठिकाणी आपला आधार नंबर आणि P च्या ठिकाणी आपला Pan Number टाकून SMS सेंड करा)
विभागाच्या वेबसाईटद्वारे : http://www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर जाऊन सुध्दा आपण आपला Pan आणि Aadhar लिंक करू शकता.
0 टिप्पण्या