इंटरनेट सांभाळून वापरा; अन्यथा....

Network वर पडतोय Load

कोरोनामुळे देशामध्ये 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. त्यामुळे मोबाईल आणि इंटरनेटच्या अनावश्यक वापरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मोबाईलचा वापर मनोरंजनासारख्या अनावश्यक कामासाठी जास्त होऊ शकतो आणि त्यामुळे नेटवर्कवर दबाव येऊ शकतो. दबाव आल्यामुळे इंटरनेटची स्पीड कमी होईल परिणामी मोबाईलवरील महत्वाच्या कामांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या परिस्थितीत मोबाईल वापरकर्त्यांनी जास्त डेटा न वापरता आवश्यक तेवढाच मोबाईलचा वापर करावा, असे मोबाईल सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांनी सांगितले आहे.

हे पण बघा : NEET Exam पुढे ढकलण्यात आली

मोबाईल सेवा पुरविणाऱ्या संघटनेचे महासंचालक राजन मॅथ्यूज यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात सांगितल्याप्रमाणे गेल्या काही दिवसात मोबाईल डेटा वापरात 30 टक्के वाढ झालेली आहे आणि त्याचे कारण म्हणजे मनोरंजनाबरोबरच Work From Home साठी मोबाईल डेटाचा वापर करण्यात येत आहे. मोबाईल वापरकर्त्यांना अनावश्यक डेटा वापर टाळावा जेणेकरून शिक्षण, आरोग्य, बँक इत्यादी महत्वाच्या सेवांसाठी पुरेशा डेटा उपलब्ध होऊ शकेल. त्याच बरोबर सकाळ आणि संध्याकाळ या वेळेत आवश्यक कामे जास्त केली जातात म्हणून वापरकर्त्यांनी मनोरंजनासाठी या वेळेत मोबाईल इंटरनेटचा वापर टाळावा, असेही त्यांनी सांगितले आहे.

हे पण बघा: कोरोनाच्या नावाने मोबाईल मधील माहिती चोरली जाऊ शकते.

जगातील काही देशांमध्ये महत्वाच्या सेवांसाठी पुरेशा इंटरनेट उपलब्ध व्हावा म्हणून सामान्य लोकांच्या इंटरनेट वापरावर मर्यादा आणण्यात आलेल्या आहेत. म्हणून अशी परिस्थिती भारतात येऊ द्यायची नसेल तर आपल्याला सुद्धा अनावश्यक कामासाठी इंटरनेटचा जास्त वापर टाळावा लागेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या