Hackers using Corona Virus to steal your data
कोरोना बाधित रुग्णांची संख्या विचारात घेता सध्या संपूर्ण देशात महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. मागील काही दिवसांची आकडेवारी लक्षात घेतली तर नवीन कोरोनाबाधितांची संख्या आधीच्या तुलनेत कमी होताना दिसते आहे. या आजारावर मात करायची असेल तर सर्वांनी काळजी घेणे गरजेचं आहे. अनावश्यक कामासाठी कुणीही बाहेर न पडलेलंच बरं. शासनाने लॉकडाऊन केलेला आहेच आपणही घरीच थांबून सहकार्य करावे.
हे पण बघा : इंटरनेट सांभाळून वापरा; अन्यथा....
हे पण बघा : इंटरनेट सांभाळून वापरा; अन्यथा....
पण इथे काळजी आरोग्याच्या दृष्टीनेच घेणे पुरेसं नाही. आपण मोबाईल किंवा कॉम्प्युटर च्या माध्यमातून इंटरनेट आणि Social Media चा वापर करीत असाल तर त्यासाठी सुद्धा काळजी घेणे गरजेचं आहे. Social Media वर विशेषतः WhatsApp वर सध्या काही मेसेजेस फिरत असताना आपल्याला बघायला मिळतील. या मेसेजेस मध्ये Free Recharge, Free Internet किंवा इतर काही मोफत गोष्टी मिळविण्यासाठी लिंक दिलेली असते. या लिंक वर क्लिक करू नका कारण यांच्या माध्यमातून आपली वैयक्तिक माहिती चोरली जाऊ शकते.
हे पण बघा : 1000 पेक्षा कमी किंमतीत Bluetooth Earphones
हे पण बघा : 1000 पेक्षा कमी किंमतीत Bluetooth Earphones
काही दिवसांपूर्वी असाच पद्धतीची एक बातमी वाचायला मिळाली. ज्यामध्ये धुळे पोलीस अधिक्षक चिन्मय पंडित यांनी Corona Virus Map नावाच्या Malware (Virus) चा शोध लावल्याचे सांगण्यात आले होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या Hackers कोरोनाच्या नावाने विविध malware (virus) चा वापर नागरिकांच्या मोबाईल मधील वैयक्तिक माहिती मिळविण्यासाठी/चोरण्यासाठी करीत आहेत.
Corona Virus Map हा त्यापैकीच एक आहे. या व्हायरसच्या माध्यमातून Hackers आपल्या मोबाईल मधून Bank Account, Password इत्यादी महत्वाची माहिती मिळवत आहेत. त्यामुळे कोरोना संदर्भात इंटरनेटवर काही शोधत असाल तर जरा जपून आणि विश्वासू वेबसाईट असेल तरच त्या लिंकवर क्लिक करा.
अशाप्रकारच्या एखाद्या लिंकवर आपण क्लिक केल्यास आपल्या मोबाईल मध्ये एक spy app डाउनलोड होईल आणि आपल्या मोबाईल मधील सर्व माहिती hackers च्या हातात असेल आणि आपल्याला समजणार सुद्धा नाही. त्यामुळे Social Media चा वापर करताना सावधगिरी बाळगा. कोणत्याही लिंक बद्दल पूर्ण माहिती नसेल किंवा लिंक संशयास्पद असेल तर त्याच्यावर क्लिक करू नका.
घरीच राहा, सुरक्षित राहा आणि मोबाईल हाताळताना सावध राहा.
0 टिप्पण्या