कोरोनाला हरविण्याची कल्पना सुचवा आणि बक्षिस मिळावा !!

Fight Corona IDEAthon

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग हैराण झाले आहे आणि त्यामुळेच सध्या भारतात लॉकडाऊन सारखी स्थिती आहे. अशातच भारतीय केंद्र सरकार कडून देशातील नागरिकांना एक आवाहन करण्यात आलं आहे, आवाहन नसून आव्हान आहे असंच समजा. कोरोनावर मात करण्याची कल्पना सुचवा आणि बक्षिस जिंका!! असे हे आवाहन आहे. याला आयडियाथॉन असे सांगण्यात आले आहे. ही आयडियाथॉन 27 आणि 28 मार्च रोजी होणार आहे.

हे पण बघा : NEET परीक्षा पुढे ढकलण्यात आली

Fight Corona IDEAthon असं या आयडियाथॉनचं नाव आहे. AICTE म्हणजेच ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन आणि मनुष्यबळ विकास मंत्रालय यांनी एकत्रितपणे ही आयडियाथॉन सुरू केली आहे. ज्या व्यक्तींच्या कल्पनांची निवड होईल त्यांना 42 लाखांपर्यंतचे बक्षिस देण्यात येईल.

हे पण बघा : YCMOU Repeater Exam Form 2020

ही कोरोना आयडियाथॉन 27 मार्च आणि 28 मार्च या दोन दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे. या दोन दिवसांमध्ये येणाऱ्या कल्पनांचे परीक्षण केले जाईल. येणाऱ्या सर्व कल्पनांची तुलना केली जाईल आणि जी कल्पना सर्वात प्रभावी असेल त्याची निवड करण्यात येईल. जोपर्यंत सर्वात सर्वात प्रभावी उपाय मिळत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील.

ज्या विद्यार्थाची किंवा शिक्षकाची कल्पना विजयी म्हणून निवड होईल त्यांना दोन लाख रुपये रोख बक्षिस देण्यात येईल तसेच ज्यांची सर्वोत्तम आयडिया निवडली जाईल त्यांना 40 लाखपर्यंतची ग्रँटही देण्यात येईल.

माहिती स्रोत : महाराष्ट्र टाईम्स

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या