Credit, Debit Card (ATM Card) सूचना ! ही सुविधा होणार बंद

Credit, Debit Card (ATM Card) Alert! New Rules for Card Holders 

जर आपल्याकडे Credit, Debit Card (ATM Card) असेल आणि तो आपण अजून एकदाही Online Transaction साठी वापरला नसेल आणि नंतर त्याचा वापर करणार असा तर आत्ताच त्या कार्डचा वापर करून घ्या. नाहीतर 16 मार्च पासून ही सुविधा आपल्या Card वरून कायमची बंद होऊन जाईल. 

रिजर्व बँक ऑफ इंडिया (RBI) ने 15 जानेवारीला प्रशिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार असे Credit, Debit Cards (ATM Cards) की ज्यांचा Online Transaction साठी या अगोदर कधीही वापर झालेला नाही असा सर्व Cards वरील Online transaction ची सुविधा बंद करण्यात येईल. 

RBI कडून बँकांना सांगण्यात आले आहे की ज्या Credit, Debit Cards (ATM Cards) चा वापर या अगोदर Online Transaction साठी करण्यात आलेला नाही त्या सर्व Cards वरील ही सुविधा 16 मार्च पासून बंद करावी. 

RBI कडून ग्राहकांना सुद्धा सांगण्यात आले आहे की जर ही सुविधा आपल्या Cards वर चालू ठेवायची असेल तर 16 मार्चच्या अगोदर आपल्या Cards वरून Online व्यवहार करून घ्या. (फक्त त्यांच्यासाठी ज्यांनी एकदाही आपला Card online व्यवहारासाठी वापरलेला नाही.) 

RBI कडून सांगण्यात आले आहे की, Credit, Debit Cards (ATM Cards) च्या सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आलेले आहे. 

याशिवाय जे ग्राहक आधीपासूनच ऑनलाईन व्यवहारासाठी आपल्या Cards चा वापर करीत आहेत असा Cards विषयी संबंधित बँक निर्णय घेईल की त्या Cards वरील सुविधा चालू ठेवायची की बंद करायची. यासंबंधीचे सर्व अधिकार बँकेकडे असतील. 

सोबतच RBI कडून बँकांना सांगण्यात आले आहे की Cards धारकांना आपला Card बंद किंवा चालू करणे, आपल्या Card वरील व्यवहारांची मर्यादा निश्चित करणे किंवा बदल करणे इत्यादी सुविधा देण्यात याव्या. ही सुविधा विविध माध्यमातून उपलब्ध राहील जसे की - mobile App / Internet Banking / ATMs इत्यादी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या