लॉकडाऊन : (NEET Exam) नीट परीक्षा पुढे ढकलण्यात आली

NEET Exam May 2020 Postponed

देशामध्ये असलेल्या लॉकडाऊनमुळे NEET परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा म्हणून NEET Exam घेण्यात येते. ही परीक्षा MBBS, BDS व AYUSH अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी प्रवेश परीक्षा असून ती 3 मे रोजी घेण्यात येणार होती. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे आणि त्यामुळेच ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे पण बघा : इंटरनेट सांभाळून वापरा; अन्यथा.....

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्विट करून याविषयीची माहिती दिली. NTA म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीला ही परीक्षा पुढे ढकलण्यास सांगितल्याचे ट्विट त्यांनी केले आहे. विद्यार्थ्यांनी लॉकडाऊनच्या ह्या काळात घरी बसून परीक्षेची तयारी करावी असेही त्यांनी सांगितले.

हे पण बघा : कोरोनाला हरविण्याची कल्पना सुचवा आणि बक्षीस जिंका !!

NTA मार्फत देण्यात आलेल्या माहितीनुसार 3 मे रोजी होणारी परीक्षा आता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात येऊ शकते मात्र परीक्षेची दिनांक अजून देण्यात आलेली नाही. परीक्षा दिनांक नंतर निश्चित करण्यात येईल.

नीट परीक्षेसाठी 27 मार्च रोजी प्रवेशपत्र उपलब्ध होणार होते परंतु परीक्षा लांबणीवर गेल्यामुळे आणि लॉकडाऊनचा काळ 14 एप्रिल पर्यंतच असेल हे सांगता येत नाही कारण सध्याची स्थिती पाहता हा काळ वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही आणि त्यामुळेच या परीक्षेची दिनांक आणि परीक्षेचे प्रवेशपत्राविषयीची माहिती 15 एप्रिल नंतरच समजू शकेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या