- बोर्डाच्या परीक्षेला रायटिंग पॅड सोबत नेले तर चालेल का?
- परीक्षेला रायटिंग पॅड अवश्य न्यावे. त्यावर उत्तरपत्रिका ठेवून लिहू शकता. मात्र हे रायटिंग पॅड पारदर्शकच असायला हवे, याची काळजी घ्यावी.
- उत्तरपत्रिकेवर कोणत्या रंगाच्या पेनने लिहावे?
- काळ्या किंवा निळ्या शाईचा बॉल पाइंट पेन प्राधान्याने वापरावा. नेहमी सोबत अतिरिक्त एक ते दोन पेन, रिफिल्स ठेवाव्यात.
- जेल पेनने पेपर लिहिला तर चालेल का?
- जेल पेनची शाई पसरते, त्याने लिखाणाचा वेगही कमी होतो. त्यामुळे शक्यतोवर बॉल पॉइंट पेनच वापरावे.
- शाळेच्या गणवेशातच परीक्षेसाठी जायचं का?
- दहावीच्या किंवा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या गणवेशातच परीक्षेला जावे असं बंधन नसतं.
- हॉलतिकिटवर स्टॅम्प हवा का?
- परीक्षेचे हॉलतिकिट आधी बोर्डाकडून शाळांना पाठवले जात असे. मात्र आता शाळा/कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांचे हॉलतिकिट ऑनलाइन डाउनलोड करतात. या हॉलतिकिटावर शाळेच्या मुख्याध्यापकांची / कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांची सही आणि शिक्का असणे आवश्यक आहे.
- WhatsApp वर आलेल्या माहितीवर विश्वास ठेवायचा का?
- WhatsApp वर आयत्या वेळी कोणत्याही प्रकारचा गैरसमज निर्माण करणारा मेसेज आला तर त्याकडे अजिबात लक्ष देऊ नये आणि घाबरू नये.
टिप : वरील सर्व माहिती महाराष्ट्र टाईम्स वरून घेण्यात आलेली आहे.
परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.......
परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.......
0 टिप्पण्या