Personal Diary किंवा Personal Storage म्हणून WhatsApp चा वापर करा | Use WhatsApp as Personal Diary


WhatsApp हे संपर्ण जगामध्ये सर्वाधिक जास्त वापरले जाणारे App आहे यात काही शंका नाही. WhatsApp मुळे जगभरातील लोकांना आपले विचार, आपली स्वप्नं, आपले यश आणि आपल्या भावना इतरांसोबत शेयर करण्यास मदत झालेली आहे. एकमेकांपासून लांब राहणाऱ्या जिवलग मित्रांना WhatsApp मुळे संपर्कात राहणे सोपे झाले, Team मध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना कामाची स्थिती एकमेकांसोबत शेयर करण्यास मदत होते इत्यादी अनेक फायदे WhatsApp मुळे झालेले आहेत.

पण आपल्याला कदाचित हे माहिती नसेल की, WhatsApp चा आपली वैयक्तिक माहिती साठवण्याचे ठिकाण किंवा App म्हणूनही वापर करता येतो. जसे की, आपल्या फोनमधील फोटो, Video, एखादी पुस्तक वाचत असताना त्यामधील एखाद्या भागाचा घेतलेला Screen Shot, वर्गामधील शिक्षकांकडून मिळालेल्या नोट्स, घराच्या सामानाची यादी, महत्वाच्या वेबसाईट लिंक इत्यादी माहिती साठवू शकतो.

WhatsApp चा असा वापर सहसा कुणी करीत नाही त्यामुळे हे विचित्र वाटू शकतं. असा पद्धतीने माहिती साठवण्यासाठी Play Store वर अनेक App सुध्दा उपलब्ध आहेत पण App डाऊनलोड केल्यास तो App Extra जागा  घेईल. पण जर WhatsApp चा वापर केला तर आपल्या फोनमधील जागासुद्धा वाचेल.

WhatsApp चा वापर Notes App सारखा करण्यासाठी खालील गोष्टी करा.

  • आपल्या WhatsApp मध्ये एका व्यक्तीला Add करून गृप तयार करा.
  • गृप तयार झाल्यावर त्या व्यक्तीला गृप मधूल काढून टाका (Remove करा.)
  • आता या गृपमध्ये आपले फोटो, व्हिडीओ किंवा आपल्याला हवी असलेली माहिती सेंड करा.

या गृप मध्ये तुमच्याशिवाय इतर कुणीही नसेल त्यामुळे यामध्ये असणारी सर्व माहिती सुरक्षित असेल. ही माहिती तुमच्याशिवाय इतर कुणीही बघू शकणार नाही.

ही WhatsApp Trick आपल्याला कसी वाटली हे आपण कमेंट करून नक्की कळवा.

या WhatsApp Trick विषयीचा खालील video बघा आणि video आवडल्यास आमच्या YouTube Channel ला Subscribe करून Facebook Page ला लाईक करा.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या