FREE RECHARGE scam | फ्री रिचार्जच्या नावाखाली फसवणूक



Social Media चा वापर करत असताना आपल्याला अनेक वेळेस असे मेसेज बघायला मिळाले असतील की ज्याच्यामध्ये Free Mobile Recharge मिळेल असा उल्लेख करण्यात आलेला असतो व त्यासाठी काही क्रिया करण्यास सांगितलेल्या असतात आणि त्या क्रिया पूर्ण केल्यावर आपल्याला रिचार्ज प्राप्त होईल अशा स्वरूपाचा तो मेसेज असतो. हा एक फसवणुकीचा प्रकार आहे त्याबद्दलची थोडीसी माहिती.
Scammers कडून एक वेबसाईट तयार करण्यात येऊन त्याच्यावर Free Mobile Recharge मिळेल असी माहिती देण्यात येते आणि एक मेसेज तयार करून तो मेसेज Social Media च्या माध्यमातून शेयर करण्यात येतो. या मेसेज मध्ये आपल्याला Free Mobile Recharge मिळविण्यासाठी काय करावे लागेल याची सविस्तर माहिती दिलेली असते.

आता जर फ्री रिचार्ज मिळत असेल तर कोणाला नको वाटेल म्हणून आपल्यापैकी भरपूर जन यास बळी पडतात. या मेसेजमध्ये देण्यात आलेली लिंक वर क्लिक केल्यावर आपल्यासमोर एक वेबसाईट ऑपन होते. यामध्ये आपल्याला mobile नंबर, आपले नाव, पत्ता इत्यादी महत्वाची माहिती विचारण्यात येते व ती माहिती भरून Next या बटणावर क्लिक करताच आपल्याला WhatsApp वरील 10 गृपमध्ये शेयर करा त्यानंतर आपल्याला रिचार्ज मिळेल असे सांगण्यात येते.  असा पद्धतीने हे Scam एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचत असते. हे सर्व केल्यावरही काही मिळत नाही.
हे सर्व करण्यामागे Scammers चे काही उद्दिष्ट्ये असतात. ती अशी :
  • आपली महत्वाची माहिती जमा करून इतर ठिकाणी विकणे.
  • आपले Mobile नंबर जमा करून ते नंबर जाहिरात करणाऱ्या कंपन्यांना विकणे. यामुळेच बहुतेक वेळा आपल्याला विविध प्रकारचे Fraud Calls येत असतात.
  • त्यांच्या वेबसाईट च्या माध्यमातून जाहिरात दाखवून पैसे कमविणे.
त्यामुळे असा Free मध्ये मिळणाऱ्या गोष्टींपासून दूर राहणेच आपल्या हिताचे आहे हे समजून घ्या. आपल्या मनात या विषयाशी किंवा एखाद्या दुसऱ्या विषयाशी निगडीत काही प्रश्न असतील खाली कमेंट करून विचारू शकता. ही माहिती आवडली असल्यास इतरांसोबत शेयर करा.

यावर आधारित खालील व्हिडीओ बघा व इतर अपडेट्ससाठी आमच्या युट्युब चॅनलला Subscribe करा.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या